Sunday, May 18, 2008

आनंद विरुद्ध कास्पारोव्ह .. सप्टेंबर १९९५... पीसीए वर्ल्ड चॅम्पियनशिप

" ए ऊठ ए... बघ .. आनंद जिंकला... "
... सकाळी सकाळी विश्वेश हातात टाईम्स नाचवत ओरडत होता.... बातमी वाचताच मीही नाचू लागलो....सालं गेलं महिनाभर ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ते घडलं होतं...आनंदने कास्पारोवला हरवलं होतं...

सप्टेंबर १९९५ मध्ये वर्ल्ड नंबर वन होण्यासाठी आनंद कास्पारोव्हच्या लढती चालू होत्या...फिडे मधून फुटून कास्पारोव्हने स्वतःची प्रोफेशनल चेस असोसिएशन काढली होती आणि न्यूयॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये ही लढत चालू होती... बेस्ट ऑफ २० मॅचेस ... कास्पारोव्ह एकदम जोरात होता....अजिबात म्हणजे अजिबात हरायचा नाही कुठेही...
आणि उत्तम खेळाडू असण्याबरोबरच दबावतंत्रात फार वाकबगार होता ... म्हणजे मॅच सुरू होण्या आधी प्रेशर आणणारी स्टेटमेंट्स देणे वगैरे ....
१९९३च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनल आधीच कास्पारोव्ह म्हणाला होता, " माय नेक्स्ट अपोनंट विल बी नाय्जेल शॉर्ट , अँड मॅच विल बी व्हेरी शॉर्ट..".... आणि फायनल ला त्याने शॉर्टला आरामात हरवलं होतं...( बहुतेक १२.५ - ७.५ असं)
...
मी तेव्हा डेन्टिस्ट्रीच्या तिसर्‍या वर्षात होतो...
विश्वेशची आणि माझी पैज लागली होती , तो म्हणाला होता, कास्पारोव्ह आनंदचा धुव्वा उडवणार....मी म्हणत होतो, आनंद टफ फाईट देणार्...आम्ही हॉस्टेलमध्ये रूममेट होतो...डीडी वर मॅचेस होत्या पण आम्ही रूमवर टीव्ही बाळगून नव्हतो...रोज टाईम्समध्ये येणारी बातमी आणि रघुनंदन गोखले यांचे परीक्षण यावरच आमची भिस्त होती...
पहिल्या आठ मॅचेस ड्रॉ झाल्या होत्या .... तसं आश्चर्यच होतं... कास्पारोव्ह इतका वेळ प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेण्यात वाया घालवत नाही... इतका वेळ खडाखडी झाल्यावर चक्क नववा गेम आनंद जिन्कला होता....
आनंद ५ गुण कस्पारोव्ह ४ गुण..... आनंद आघाडीवरती....दिवसभर खुशीत फिरलो भरपूर.....

आज नेटवर फिरता फिरता भटकंतीत यूट्यूबवरती आनंदचा हाच तो नववा गेम आणि त्याचं ऍनलिसिस सापडलं.... (कॉमेंट्री जरा भडक ओवरेक्सायटिंग आहे, पण गंमत आहे....)
कास्पारोव्हचे दबावतंत्र, स्टाईल्स, मध्येच उठून जाणे, ऍक्टिंग आणि त्या तुलनेत आनंदचे शांत, काहीसे नवखे हावभाव बरेच सांगून जातात... मॅच हारल्यानंतर तर कास्पारोव्हचे अस्वस्थ होणे आणि आनंदचे मनःपूर्वक शांत राहणे पाहून फार बरे वाटले...

http://www.youtube.com/watch?v=FutTQZfFDuI नवव्या गेमचा हा भाग एक

http://www.youtube.com/watch?v=nrkh9zCAWSo नवव्या गेमचा हा भाग दोन

मात्र आमचा आनंद फार काळ टिकला नाही... दुसर्‍याच दिवशी कळले की कास्पारोव्हने दहाव्या गेममध्ये पांढर्‍या मोहर्‍यानी आनंदला हरवले.... डिवचला गेलेल्या कास्पारोव्हने तो गेम अगदी खुन्नसने खेळला होता, आणि आनंदला काहीही संधी दिली नव्हती... मला आठवतेय रघुनंदन गोखले यांनी त्यांच्या परीक्षणात लिहिले होते की ही सेट द बोर्ड ऑन फायर...( हा दहावा गेमही यूट्यूबवर सापडतो दोन भागात).... मग अकरावाही जिंकला.... बाराव्या गेममध्ये कास्पारोव्ह जिन्कायचाच पण आनंद कसाबसा निसटला... ड्रॉ झाला...आनंद मग तेरावाही हरला आणि पुढच्या सगळ्या ड्रॉ होत गेल्या... आनंद हरला ती मॅच पण काय फाईट दिली त्याने....

मला आधी चेसमधले पीसेस आणि त्यांचे चलन सोडता फारसे कळत नव्हते पण १९९५ च्या त्या सप्टेंबरपासून मला चेसचा बराच नाद लागला, ( चेसची पुस्तके आणणे, रात्र रात्र गेम्स वाचत बसणे, डोक्यात चेसची चक्रे फिरत राहणे, आपले फालतु गेम्ससुद्धा लिहून काढणे, गेम सुरू होण्या आधी कास्पारोव्हची सर्व पीसेसना हात लावून नीट ठेवायची स्टाईल मारणे..असे बराच काळ चालले)...पुढचे सहा महिने माझ्या डोक्यावर हे भूत स्वार होतं... म्हणजे मला चांगलं खेळता येत नाही, पण चेस येणार्‍या माणसाबरोबर जनरल बोलबच्चनगिरी करण्याइतपत चेस यायला लागलं , पुष्कळ झालं....

या यूट्यूबने त्या धमाल दिवसांची आठवण करून दिली ....... आता विश्वेशला कळवायला हवी ती यूट्यूबची लिन्क... उद्या सकाळीच फोन करतो.
इथे कोणाला आठवताहेत का ते दिवस?

1 comment:

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर said...

मला १९६८-६९ च्या सुमाराची, कदाचित साल पुढेमागे होईल आठवण झाली. रशियाचा बोरिस स्पास्की विरुद्ध बॉबी फिशर हा सामना विश्वविजेतेपदासाठी होता. बहुधा पहिल्याच विश्वविजेतेपदाचा. मी तेव्हा नुकताच बुद्धिबळे खेळायला शिकलो होतो. त्या वेळि बॉबी फिशरने जे तंत्र वापरले तेच दबावतंत्र कॅस्परॉवने वापरले आहे. असो. पण वाचायला मजा आली. आम्ही दुसरे दिवशी वर्तमानपत्रात निकाल व परीक्षण वाचत होतो. तुमच्या सुदैवाने तुम्हाला नवीन तंत्रज्ञानाने जास्त तपशील आणि त्वरित कळतात.

sudhirkandalkar.blogspot.com