Sunday, May 18, 2008

एकापेक्षा एक ....झी मराठी नृत्यस्पर्धा...जय महागुरु...

आम्ही आधी ही स्पर्धा की काय आहे ते अजिबात पाहत नव्हतो...पण गेले पाच सहा भाग आम्ही घरच्या मंडळींच्या आग्रहाखातर पाहिले...जूरींनी एक वाक्य बोलायचे, महागुरूंनी स्वत:च्या कौतुकाची २० वाक्ये बोलायची आणि बान्देकरांनी निरर्थक १५ वाक्ये बोलायची, मधून मधून डान्स...असा हा कार्यक्रम आहे...
सचिन यांच्या चित्रपटातील अभिनय , दिग्दर्शन कौशल्याचा पूर्ण आदर ठेवून ( 'अशी ही बनवाबनवी'चे आम्ही प्रचंड फ्यान आहोत आणि राहू...)आवर्जून सांगावेसे वाटते की सचिन नृत्यामधले महागुरू कधीपासून झाले बुवा??? ( ती नच बलिये ही स्पर्धा जिन्कल्यापासून??? )एखाद्या कलेमध्ये आयुष्यभर कष्ट काढले तरी लोक स्वतःच स्वतःला महागुरू म्हणवायला घाबरतील... ( इथे तर काय, सतत महागुरु आले, महागुरू गेले, महागुरु उठले , महागुरु बोलले, महागुरूंनी कौतुक केले...)हा माणूस नृत्यामधला महागुरू ?? बासच...स्वत:च प्रोड्यूसर आणि स्वत:च डिरेक्टर असताना त्याच शो मध्ये स्वत:चे इतके कौतुक करून घेण्याचे कारण मला कळत नाही.... यांना कोणी मराठी थोर नृत्यदिग्दर्शक किंवा नर्तक मिळाला नाही काय???( आहेत , काही जूरी आहेत...असून नसल्यासारखे ... त्यांच्या कॉमेंट्स एका वाक्यात गुंडाळायला लावतात...)
आणि महागुरु स्वतः मात्र प्रत्येक कॊमेन्ट मध्ये प्रचंड फ़ूटेज खातात, एकदा डावीकडे एकदा उजवीकडे बघत एक वाक्य बोलून टाळ्या वाजेपर्यंत थांबणार, मग त्या कस्टमरी टाळ्या वाजणार, मग महागुरू पुन्हा ऐटीत डावीकडे उजवीकडे पाहणार, मग म्हणणार, " ..नाही , म्हणजे मला डीटेल्स कळत नाहीत, पण तू अन्तर्‍याच्या सुरुवातीला एक स्टेप मिस केलीस आणि विसरलीस , ऎम आय राईट?? " मग पुन्हा डावीकडे मग उजवीकडे लूक.... पुन्हा टाळ्या....मग ..." मी जेव्हा बाईच्या वेषात डांस केला होता तेव्हा ....." ही ष्टोरी सांगून सम्पली की ..." कारण स्त्री ही देवतेसारखी असते , नारीची पूजा केली जाते तेथे ...." छापाची वाक्ये ..मग पुन्हा टाळ्या....पुढल्या वेळेला त्यांच्या लहानपणाची गोष्ट...टाळ्या टाळ्या....ज्याची बॅट आणि बॉल असतो तो पोरगा तीन चार वेळा आउट होउनही परत बॅटिंग करतोच, तसं वाटतं हे पाहताना....
बान्देकरांचे एक कौशल्य बाकी मस्तच आहे, ते जोक करायचा प्रचंड प्रयत्न करतात....पन्धरा वीस प्रयत्नांनंतर त्यांना दीड तासांत एखादा जोक जमून जातो...काय चिकाटी आहे...!!! त्यांच्या जोक वरचे हशे एडिटिन्ग मध्ये इन्सर्ट करावे लागत असणार...बर्‍याचदा वाक्यरचना चुकल्यामुळे आणि टायमिंग चुकल्याने त्यांचे जोक फ़सतात, आणि स्पर्धकाला कसनुसं हसावं लागतं. ( ते तरी काय करणार बिचारे?) त्यांचे फ़सलेले जोक एडिट का करत नाहीत?? इतके जोक फ़सतात की एडिट तरी किती करणार म्हणा...( सचिन ने बान्देकरांचे कॉमेडी टायमिंग बद्दल क्लासेस घ्यावेत)...हा व्यवस्थित स्क्रिप्ट नसल्याचा परिणाम आहे... ( ऐन वेळी होते ती फक्त फजिती... पी .एल.)
पुढल्या वेळी सचिन आणि बान्देकर या दोन मंडळींनाच या स्पर्धेतून हाकलले तर स्पर्धा अधिक प्रेक्षणीय होईल....
कोण स्पर्धक आला आणि कोण गेला, कसा नाचला, यात आम्हाला स्वारस्य नाही परंतु या कार्यक्रमामुळे सचिन यांच्याबद्दलचा आदरभावाला धक्का निश्चित लागला....

4 comments:

भडकमकर मास्तर said...

मी बर्‍याच जणांशी बोललो तेव्हा सचिन असल्या कार्यक्रमात पुष्कळ जणांच्या डोक्यात जाताना दिसतो... सामान्यतः चॅनल जागरूक पणे फीड्बॅक ठेवत असते असा माझा समज आहे.... ( आपल्याला कितीही वाईट वाटणार्‍या मालिका दूरदूरच्या भागात उत्तम पाहिल्या जातात, त्यामुळे काही थोड्या लोकांसाठी ते इतका प्रेक्षकवर्ग सोडू शकत नाहीत ... असो.... म्हणजे ज्या अर्थी हा कार्यक्रम सतत चालू असतो ( नाचाचा) त्या अर्थी " सचिन किती छान कॉमेंट्स करतात नाही?".. बान्देकर तर " केवळ अप्रतिम " असे म्हणणारे लोक अस्तित्त्वात असणार्.... ))) आनन्द आहे...

भडकमकर मास्तर said...

मी बर्‍याच जणांशी बोललो तेव्हा सचिन असल्या कार्यक्रमात पुष्कळ जणांच्या डोक्यात जाताना दिसतो... सामान्यतः चॅनल जागरूक पणे फीड्बॅक ठेवत असते असा माझा समज आहे.... ( आपल्याला कितीही वाईट वाटणार्‍या मालिका दूरदूरच्या भागात उत्तम पाहिल्या जातात, त्यामुळे काही थोड्या लोकांसाठी ते इतका प्रेक्षकवर्ग सोडू शकत नाहीत ... असो.... म्हणजे ज्या अर्थी हा कार्यक्रम सतत चालू असतो ( नाचाचा) त्या अर्थी " सचिन किती छान कॉमेंट्स करतात नाही?".. बान्देकर तर " केवळ अप्रतिम " असे म्हणणारे लोक अस्तित्त्वात असणार्.... ))) आनन्द आहे...

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर said...

ऋण लोकप्रियता वगैरे जर कांही प्रकार असेल तर बुशच्या खालोखाल सचीनचा (पिळगांवकर तेंडुलकर नव्हे) नंबर लावायला हरकत नाही. स्वत:भोवती आरती ओवाळावी पण किती. मला एका माजी राजकीय नेत्याच्या दूरदर्शनवर दिसण्यामुळे अशा खचकलेल्या अमराठी म्हातार्‍याच्या शब्दांची आठवण आली. ... ओ भाई ...ओ. लेकिन कितनी बार? बीटिंग ओऽऽन ड्रम्स ऑल टाईम.

सुधीर कांदळकर
sudhirkandalkar.blogspot.com

Unknown said...

agadi khara aahe..